
मुंबईत १२४ नवे कोरोना रुग्ण, शून्य मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई पालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज दिवसभरात १२४ नवे कोरोना रुग्ण आढळले. आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १,०६१,०३८ झाली. तसेच मुंबईत आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृत्यूची संख्या १९,५६३ एवढ्यावर स्थिरावली.
सध्या शहर उपनगरात ८५१ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ११७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण १,०४०,६२४ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांपैकी १२२ रुग्ण लक्षणविरहित असून दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. शहर उपनगरातील २५ हजार २४९ खाटांपैकी केवळ २३ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६,१६१ दिवसांवर येऊन ठेपला आहे. ६ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पालिकेने मागील २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील एकूण ९१४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06208 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..