
मुंबईसह राज्यात ढगाळ वातावरण
मुंबई, ता. ११ : मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आज (ता. ११) सकाळी ढगाळ वातावरण होते. प. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा हा प्रभाव असल्याचे हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली परिसरात आज सकाळपासून ढगांचे सावट होते. याशिवाय कोकणात, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा काही भागात ढगाळ वातावरण होते. मुंबईतही ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंशांची घट झाली. कुलाबा येथे ३२.८, तर सांताक्रूझ येथे ३४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. प.बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. सध्या हे वादळ वायव्येकडे सरकून उत्तर आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा प्रभाव कमी होत कमकुवत होण्याची शक्यता हवावान विभागाने वर्तवली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06209 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..