बिघाडामुळे प्रवाशी मोनोत अडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिघाडामुळे प्रवाशी मोनोत अडकले
बिघाडामुळे प्रवाशी मोनोत अडकले

बिघाडामुळे प्रवाशी मोनोत अडकले

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : चेंबूर ते सात रस्ता दरम्यान धावणाऱ्या मोनोत बुधवारी (ता. ११) रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने त्यात प्रवासी अडकून पडले होते. तब्बल एक ते दीड तास अडकून पडल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. अखेर वडाळा डेपोमधून दुसरा मोनो रेक आणून त्यातून प्रवाशांना इच्छित स्थानकावर नेण्यात आले. चेंबूरहून दुपारी १२.५१ च्या सुमारास सुटलेली मोनो तांत्रिक बिघाडामुळे वडाळा येथे बंद पडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ही मोनो ओढून आणण्यासाठी दुसरी मोनो पाठविण्यात आली होती. त्यानंतर ४० मिनिटांनी मोनोत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केल्याची माहिती मोनो प्रशासनाकडून देण्यात आली.
-------
चेंबूरहून दुपारी एकच्या सुमारास मोनोतून प्रवास करत होती, मात्र वडाळा येथे मोनो बंद पडली. सर्व प्रवासी त्यात अडकून पडले होते.
- पूजा सूरज परदेशी, प्रवासी.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06212 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top