खंडणी उकळणाऱ्या बंटी-बबलीला बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणी उकळणाऱ्या बंटी-बबलीला बेड्या
खंडणी उकळणाऱ्या बंटी-बबलीला बेड्या

खंडणी उकळणाऱ्या बंटी-बबलीला बेड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईत बंदुकीच्या धाकाने खंडणी उकळणाऱ्या बंटी-बबलीला कांदिवली पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. हे जोडपे बंदूक घेऊन कांदिवली परिसरात येणार असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशीत जोडप्याने पिस्तुलाच्या जोरावर कांदिवली व परिसरात आपला धाक निर्माण करत खंडण्या गोळा करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या जोडप्यावर चारकोप, एमएचबी, मालवणी, मालाड आणि कांदिवली पोलिस ठाण्यात चोरी, चेन स्नॅचिंग, खंडणी व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आदम शेर महंमद खान उर्फ बंटी (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून महिला आरोपीचे नाव श्वेता सूर्यकांत लाड उर्फ बबली (२४) असे आहे. बंटीविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत १३ गुन्हे दाखल असून, त्याची प्रियसी असलेल्या बबली विरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. बंटी अनेकदा तुरुंगातही गेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06215 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top