सार्वजनिक शौचालयात महिला सुरक्षारक्षक नेमा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक शौचालयात
महिला सुरक्षारक्षक नेमा!
सार्वजनिक शौचालयात महिला सुरक्षारक्षक नेमा!

सार्वजनिक शौचालयात महिला सुरक्षारक्षक नेमा!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : सार्वजनिक शौचालयांमध्ये होणाऱ्या महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक शोषणाची दखल घेत अशा ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना पोक्सो विशेष न्यायालयाने राज्य सरकारला केली. २०१६ मध्ये झालेल्या एका सहावर्षीय मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात विशेष न्या. एच. सी. शेंडे यांनी एका सफाई कामगाराला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारला सूचना केल्या. सार्वजनिक शौचालयात महिला सुरक्षा रक्षक असण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तिथे जाणारी लहान मुले एखाद्या निकटवर्तीय व्यक्तीबरोबर असायला हवी. अन्यथा बालवयात घडलेल्या अशा प्रकारच्या घटनेचा ओरखडा आयुष्यभर मनावर राहू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केले आहे. पालकांनीही जागृत होऊन सार्वजनिक प्रसाधनगृहात मुलांना पाठवताना खबरदारी घ्यावी, असेही न्यायालयाने सुचवले आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालयांची गरज आहे, पण त्यांची संख्या मर्यादित असून ती झोपडीवासीयांच्या घराजवळ नाहीत. त्यामुळे मुलांना तिथे एकटे पाठवले जाते. अशावेळी कोणीतरी विश्वासू व्यक्ती सोबत असायला हवी, असेही न्यायालयाने म्हटले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06218 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top