पर्यावरणीय कृती आराखड्याची गरज वातावरण बदलाबाबत आदित्य ठाकरे यांचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray
पर्यावरणीय कृती आराखड्याची गरज

पर्यावरणीय कृती आराखड्याची गरज वातावरण बदलाबाबत आदित्य ठाकरे यांचे मत

मुंबई : वातावरण बदलामुळे कधी अचानक अतिवृष्टी, कधी जीवघेणी थंडी; तर कधी तापमानात अचानक वाढ होऊन समस्या निर्माण होत आहेत. वातावरण बदलाने आपल्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आपण सर्वांनी मिळून याचा सामना करणे गरजेचे असून त्यासाठी पर्यावरणीय कृती आराखड्याची गरज असल्याचे मत राज्याचे पर्यावरण तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. ‘क्लायमेट क्राईसीस २.१ : मोबिलायझिंग फायनान्स फॉर कोस्टल सिटीज’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते.

वातावरण बदलाचा सर्वत्र फटका बसत आहे. एका ठिकाणी पूरसदृश परिस्थिती, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळ अशी परिस्थिती दिसते. आपण मंगळावर पाणी शोधले; पण आपण आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सोडवलेला नाही. मुंबईत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गारगाई-पिंजार प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत; मात्र ही कामे वेगवेगळ्या विभागाशी निगडित असल्याने त्यांच्या परवानग्यांना वेळ लागत आहे. यामुळे विकासाला खिळ बसते. यावर पर्याय म्हणून एकच यंत्रणा नियुक्त करण्याचा विचार सुरू असल्याचेही ठाकरे पुढे म्हणाले.

मुंबईत पूरपरिस्थिती येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अलीकडे मुंबईत भूस्खलन, पूर, वादळे येण्याच्या घटना वाढल्या आहेत. सर्वसाधारणपणे प्रतितास ७० मिलिमीटर पाऊस झाला तर पाणी साचते. मुंबईत बऱ्याचदा यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यावर पर्याय म्हणून आम्ही हिंदमाता येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केले आहेत. अशा प्रकारे आणखी किती प्रकल्प हवेत, याचा ही विचार सुरू आहे. याशिवाय स्टॉर्म वॉटर क्षमता वाढवण्याचा प्रयत्नही सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग
‘क्लायमेट क्राईसीस २.१ : मोबिलायझिंग फायनान्स फॉर कोस्टल सिटीज’ या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत उगो अस्तुटो, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम भारताचे प्रमुख डॉ. अतुल बागई, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या. इंडोनेशिया, श्रीलंका, नेदरलँड, सिंगापूर आणि जपानचे महावाणिज्य दूत, महाराष्ट्र सरकार, युरोपियन युनियन, नेदरलँडचे वाणिज्य दूतावास आणि मॅकिन्से यांनीदेखील मार्गदर्शन केले. मुंबई आणि महानगर प्रदेशात लवचिकता विकसित करण्यासाठी हवामान फायनान्स एकत्रीकरण कसे महत्त्वाचे आहे, यावर उद्देशपूर्ण चर्चा करण्यात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06219 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top