महापौरांना व्यापक अधिकारांची गरज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापौरांना व्यापक अधिकारांची गरज!
महापौरांना व्यापक अधिकारांची गरज!

महापौरांना व्यापक अधिकारांची गरज!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : शहरांचे योग्य आणि वेळेत नियोजन होणे आवश्यक आहे. अनेक कामे लालफितींमध्ये अडकून पडत असल्याने विकासाला खीळ बसते. त्यासाठी महापौरांना व्यापक अधिकार देणे गरजेचे असून त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
शहरांमध्ये वेगाने विकास कामे होणे गरजेचे असते; मात्र वेगवेगळ्या प्राधिकरणांमुळे कामे रखडतात. त्यामुळे मुंबईसाठी एकच नियोजन संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. शहरातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महापौरांना व्यापक अधिकार दिले पाहिजेत, असे ठाकरे म्हणाले.
मलजल प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) कामात घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधक करतात; मात्र आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. पालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लान्टच्या कामाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले असून त्यांच्या निगराणीखाली काम सुरू आहे. त्यामुळे आरोप करणारे विरोधक पालिकेवर नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचेही ठाकरे म्हणाले.
---
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी
राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय आपण सर्वप्रथम घेतला. काही ठिकाणी निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. कोविडमुळे आपण अधिक कारवाई केली नाही. आता मात्र प्लास्टिकबंदीबाबत केंद्राचे नवे धोरण येऊ घातले आहे. त्याचा अधिक परिणाम होणार आहे. त्यासोबत राज्यात प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी होणार असून कडक कारवाई सुरू करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
.........

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06221 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top