
मुंबई आणि गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या
मुंबई, ता. १२ : मध्य रेल्वेने नुकतीच ६९० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली होती. उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि गोरखपूरदरम्यान विशेष शुल्कासह १२ आणखी अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
१. गाडी क्रमांक ०२१०३/०२१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष गाडीच्या १६ मे पासून ते ३० मेपर्यंत तीन फेऱ्या सोडण्यात येणार आहे. दर सोमवारी पहाटे ५.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक ०२१०५/०२१०६ लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष गाडीच्या सहा फेऱ्या धावणार आहेत. १८ मेपासून ते १ जूनपर्यंत ३ फेऱ्या प्रत्येक बुधवारी पहाटे ५.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचेल.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06222 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..