कामाठीपुरा पुनर्विकासाचा निर्णय मंत्रिमंडळाकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामाठीपुरा पुनर्विकासाचा 
निर्णय मंत्रिमंडळाकडे
कामाठीपुरा पुनर्विकासाचा निर्णय मंत्रिमंडळाकडे

कामाठीपुरा पुनर्विकासाचा निर्णय मंत्रिमंडळाकडे

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा अंतिम आराखडा म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामाठीपुरा पुनर्विकासाचा निर्णय होणार आहे. या पुनर्विकासासाठी मंडळाने म्हाडाला नियोजन प्राधिकरण नेमण्याचा प्रस्ताव दिला आहे.
कामाठीपुरा येथील सुमारे ४० एकर जमिनीवर वसलेल्या एक हजार इमारतींपैकी ७०० इमारती आणि चाळी १०० वर्षे जुन्या असून सध्या त्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. किमान ५० ते १८० चौरस फुटांच्या छोट्याशा खोलीत येथील रहिवासी धोकादायक अवस्थेत राहत असल्याने हा पुनर्विकास एक आव्हानात्मक बाब ठरणार आहे. या इमारतींचा पुनर्विकास तातडीने मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांनी सैफी-बुऱ्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टच्या (एसबीयूटी) धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला दिले होते. त्यानुसार मंडळाने इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
४० एकर जागेवरील आणि दाटीवाटीने उभारलेल्या इमारतीच्या पुनर्विकास म्हाडामार्फत करणे अशक्य असल्याने खाजगी विकासकांच्या मदतीने हा प्रकल्प मार्गी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. यासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्याचा प्रस्ताव मंडळाने दिला आहे. हा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.
......
कामाठीपुरा पुनर्विकासाचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल.
- अरुण डोंगरे, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06224 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top