राज्यात दिवसभरात कोरोना २३१ रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दिवसभरात कोरोना २३१ रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात कोरोना २३१ रुग्णांची नोंद

राज्यात दिवसभरात कोरोना २३१ रुग्णांची नोंद

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : राज्यात आज दिवसभरात एकूण २३१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७८,८०,०७४ झाली आहे. आज २०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,७८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १४३४ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.
राज्यात एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण १,४७,८५१ एवढे मृत्यू नोंद झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०४,८०,९२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८०,०७४ (०९.८४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईतील रुग्णांमध्ये वाढ
मुंबईच गुरुवारी कोविड रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली. दिवसभरात १३९ नवे रुग्ण आढळले. मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०,६१,१७७ झाली आहे. एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६३ एवढ्यावर स्थिर आहे.
सध्या शहर उपनगरात ८६० रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण १,०४०,७५४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांपैकी १३१ लक्षणविरहित असून आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६११६ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत एकूण १,०६१,१७७ कोरोना बाधित असून मृतांची संख्या १९ हजार ५६३ इतकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06225 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top