मुंबईतील किमान तापमानात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील किमान तापमानात वाढ
मुंबईतील किमान तापमानात वाढ

मुंबईतील किमान तापमानात वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : ‘असनी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईतील कमाल तापमान स्थिर असले, तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमान दोन ते तीन अंशाने वाढल्याने गुरुवारची सकाळ नेहमीपेक्षा उबदार जाणवली. ढगाळ वातावरण आणि तापमानात झालेली वाढ त्यामुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये शारीरिक काम करणाऱ्यांनी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत गुरुवारी सकाळी कुलाबा येथे २७.६; तर सांताक्रूझ येथे २८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यापूर्वी किमान तापमान २५ अंश सेल्सियसच्या आसपास होते. कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर असले, तरी किमान तापमानात वाढ झाल्याने रात्रीदेखील उष्मा वाढला आहे.
---
किनारपट्टीवर पश्चिमेकडील उष्ण वाऱ्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेमुळे कमाल तापमान कमी-जास्त होत असल्याने अशी परिस्थिती उद्भवते.
- सुषमा नायर, शा‍स्त्रज्ञ, मुंबई हवामान केंद्र

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06228 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top