‘जसलोक’चे कंत्राटी कामगार कायमस्वरूपी सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जसलोक’चे कंत्राटी कामगार कायमस्वरूपी सेवेत
‘जसलोक’चे कंत्राटी कामगार कायमस्वरूपी सेवेत

‘जसलोक’चे कंत्राटी कामगार कायमस्वरूपी सेवेत

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : गेली अनेक वर्षे जसलोक रुग्णालयातील कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न अखेर मार्गी लागले आहेत. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जसलोक रुग्णालयातील अदर युनियनचे प्रमुख सल्लागार निशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने जसलोक रुग्णालयातील काही कामगार कायमस्वरूपी सेवेत रुजू झाले आहेत. 
रुग्णालय व्यवस्थापनाशी गेले सात ते आठ महिने पत्रव्यवहार करून हा प्रश्न अखेर निकाली काढला गेला. गेली अनेक वर्षे रखडलेल्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच २५ कामगारांना यूटीएलटी सीनिअर पदाचे प्रमोशन पत्र सीईओ जितेंद्र हरियाण यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच १५९ कामगारांचे पूर्वीचे पद बदलून सन्मानजनक पद देण्यात आले व कालांतराने ज्येष्ठतेप्रमाणे भविष्यात प्रमोशन देण्यात येईल, अशी माहिती सल्लागार निशिकांत शिंदे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06232 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top