
मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वे मुंबई विभाग पळसदरी स्थानकावर तीन टप्प्यांत १४० टी रेल्वे क्रेन वापरून २८ मीटर आणि २५.५७ मीटरचे दोन स्पॅन बसवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक निश्चित करणार आहे. परिणामी, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. मध्य रेल्वेवरील कर्जत ते जांब्रुंगपर्यंत डाऊन रेल्वे मार्गावर १६ मे रोजी सकाळी १०.५० ते दुपारी १.५० पर्यंत पहिला ब्लॉक घेतला जाईल. मात्र, याचा रेल्वे सेवेवर परिणाम होणार नाही. १७ मे रोजी मध्यरात्री १.५५ ते सकाळी ६.५५ पर्यंत कर्जत ते जांब्रुंग डाऊन मार्गावर आणि कर्जत ते ठाकूरवाडीपर्यंत दुसरा ब्लॉक घेण्यात येईल.
सीएसएमटी येथून पहाटे ४.२४ वाजता सुटणारी खोपोली लोकल कर्जत येथे ११ मिनिटांसाठी नियमित केली जाईल. कर्जत येथून सकाळी ५.४३ वाजता सुटणारी खोपोली लोकल रद्द राहील. खोपोली येथून ६.१६ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल खोपोली ते कर्जतदरम्यान रद्द राहील. ही गाडी कर्जत येथून सीएसएमटीसाठी सुटेल. गाडी क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम- एलटीटी एक्स्प्रेस, १२७०२ हैदराबाद- सीएसएमटी हुसेनसागर एक्स्प्रेस,१११४० गदग- सीएसएमटी एक्स्प्रेस, १९५६७ तुतिकोरिन-ओखा एक्स्प्रेस या गाड्या नियमित केल्या जातील आणि निर्धारित वेळेच्या १५ ते ३० मिनिटे उशिराने पोहोचतील.
१८ मे रोजी तिसरा ब्लॉक
नागनाथ-कर्जत अप मार्गावर आणि खोपोली- पळसदरी मार्गावर १८ मे रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत तिसरा ब्लॉक घेतला जाईल. सीएसएमटीहून रात्री ९.२६ वाजता सुटणारी कर्जत लोकल खोपोलीपर्यंत धावेल. गाडी क्रमांक १२७०२ हैद्राबाद-मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस, १११४० गदग - मुंबई एक्स्प्रेस, २२१५८ चेन्नई - मुंबई एक्स्प्रेस, ११०२२ तिरुनेलवेली- दादर एक्स्प्रेस, २२७१८ सिकंदराबाद -राजकोट एक्स्प्रेस, १२११६ सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस तसेच गाडी क्रमांक ११०२८ चेन्नई-मुंबई मेल, १७३१७ हुब्बल्ली- दादर एक्स्प्रेस गंतव्यस्थानावर निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06233 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..