देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचारास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचारास नकार
देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचारास नकार

देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचारास नकार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : खंडणीवसुलीच्या आरोपात अटकेतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयाने खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी जे. जे. शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अनिल देशमुख खांदेदुखीने त्रस्त असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे, असा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मला खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी, या उपचारांचा खर्च मी करेन, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. मात्र ईडीने या अर्जाला विरोध केला. देशमुख यांच्यावर जेजेमध्ये शस्त्रक्रिया होऊ शकते, जेजेमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, असे ईडीच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयात जेजेमधील वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवालदेखील दाखल करण्यात आला. विशेष न्या. राहुल रोकडे यांनी हा युक्तिवाद मान्य करून अर्ज फेटाळला. खंडणी आणि मनीलाँडरिंग आरोपात देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक झाली होती. त्यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणीवसुलीचे आरोप केले आहेत. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाले. सुमारे चार कोटींची रक्कम मनीलाँडरिंगद्वारे देशमुख यांनी स्वतःच्या संस्थेत वळवली, असा आरोप ईडीने ठेवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06234 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top