मलिक यांना उपचारासाठी अंशतः दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik
मलिक यांना उपचारासाठी अंशतः दिलासा

मलिक यांना उपचारासाठी अंशतः दिलासा

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक यांची वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी विशेष न्यायालयाने नामंजूर केली आहे. मात्र त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली. यामुळे मलिक यांना अंशतः दिलासा मिळाला आहे.

या उपचारासाठी मलिक यांच्यासह त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर राहू शकते, असेही विशेष न्या. राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले आहे. कुर्लामधील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. मलिक यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यांना किडनीचा विकार असून त्यांच्यावर अटकेआधीपासूनच उपचार सुरू होते. कारागृहात त्यांना त्यांच्या डॉक्टरांकडून उपचार घेऊ न दिल्याबद्दल न्यायालयाने ईडीवर नाराजी व्यक्त केली. मलिक यांनी सहा आठवड्यांचा तात्पुरता वैद्यकीय जामीन देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी नामंजूर करण्यात आली. कुर्लामधील सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या जमीन खरेदी व्यवहारात मलिक यांनी गॅंगस्टर दाऊद इब्राहिमसाठी काम केले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीने पैसा मिळविला, असा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. मलिक यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06235 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top