
तिन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (ता. १५) अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेल विभागादरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांतून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी असेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत.
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकापासून अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. लोकल नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कुठे : हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत.
परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी अप आणि डाऊनची लोकल बंद.
कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत.
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर धावेल. ब्लॉकमुळे अप आणि डाऊन काही लोकल सेवा रद्द होतील.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06238 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..