कोकण मंडळाची जूनमध्ये सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण मंडळाची जूनमध्ये सोडत
कोकण मंडळाची जूनमध्ये सोडत

कोकण मंडळाची जूनमध्ये सोडत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ठाणे, विरार येथे १ हजार २०० घरांच्या सोडतीची जाहिरात जून महिन्यात काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीमध्ये म्हाडा योजना, पंतप्रधान आवास योजना आणि खासगी विकसकांकडून म्हाडाला प्राप्त झालेल्या २० टक्के योजनेतील घरांचा समावेश असेल, असे म्हाडाचे मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे यांनी सांगितले.

कोकण मंडळाने मागील वर्षी १४ ऑक्टोबर रोजी ८ हजार ९८४ घरांची सोडत काढली होती. या सोडतीसाठी २ लाख ४६ हजार ६५० विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. २० टक्के योजनेतील घरांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. सोडतीनंतर २० टक्के योजनेतील विजेत्यांची पात्रता निश्चित झाल्यानंतर त्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; तर म्हाडा योजना आणि पंतप्रधान आवास योजनेतील विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्यास ३१ मे ची मुदत दिली गेली आहे. या सोडतीनंतर मंडळाने १,२०० घरांची सोडत काढण्याची तयारी केली आहे. या सोडतीची जाहिरात जून महिन्यात काढण्यात येणार असल्याचे आडे यांनी संगितले. या सोडतीमध्ये २० टक्के योजनांतून म्हाडाला मिळालेल्या घरांचा समावेश आहे. तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिविली, वसई-विरार या महानगरपालिका हद्दीतील घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. म्हाडा योजनेतील विरार आणि पंतप्रधान आवास योजनेतील शिरढोण, भंडर्ली, गोटेघर येथील घरांचा समावेश असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06239 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top