चार महिन्यात ५०४ मुलांची घरवापसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार महिन्यात ५०४ मुलांची घरवापसी
चार महिन्यात ५०४ मुलांची घरवापसी

चार महिन्यात ५०४ मुलांची घरवापसी

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत गेल्या चार महिन्यांत ५०४ मुलांची सुटका केली. त्यात ३३० मुले आणि १७४ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी आरपीएफला ‘चाईल्ड लाईन’सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली.

रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत हरवलेल्या/घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे. देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.
---
मध्य रेल्वेची कामगिरी (जानेवारी ते एप्रिल २०२२)
विभाग----- मुले------- मुली---- एकूण
मुंबई-----२०६-------७९------ २८५
पुणे ------५० -------२१ -------७१
भुसावळ---- ४७------४५------- ९२
नागपूर-----१२-------२०-------३२
सोलापूर----१५-------९-------२४
एकूण -----------------------५०४

---
मानवी तस्करीविरोधातही प्रयत्न
रेल्वेने अलीकडेच ‘असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन’सोबत देशातील रेल्वेमार्गे होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ही संघटना नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रेन फाऊंडेशनशी संबंधित आहे. तसेच आरपीएफने मानवी तस्करी विरुद्ध ‘ऑपरेशन आहत’ सुरू केले आहे. रेल्वेकडून मानवी तस्करीविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06240 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top