‘पंतप्रधान आवास’मधून वसईत ७६ हजार घरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पंतप्रधान आवास’मधून वसईत ७६ हजार घरे
‘पंतप्रधान आवास’मधून वसईत ७६ हजार घरे

‘पंतप्रधान आवास’मधून वसईत ७६ हजार घरे

मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वसई पूर्व येथे ३६० एकरवर सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणारा ७५ हजार ९८१ घरांचा हा प्रकल्प म्हाडाने मंजूर केला. या प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७ हजार, तर अल्प उत्पन्न गटातील १७ हजार घरे उपलब्ध होणार आहेत, तर उर्वरित ३२ हजार घरांची विक्री स्वतः विकसक बाजारभावाप्रमाणे करणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यानुसार म्हाडाने ‘कॉन्सेपच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिसेस एलएलपी’ कंपनीच्या वसई पूर्व येथील सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. वसई रेल्वे स्थानकापासून १.४ किलोमीटर अंतरावर ३६० एकर जमिनीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील ४५ हजार १७२ घरे उभारण्यात येणार आहेत. यापैकी २७ हजार घरे म्हाडाच्या दरानुसार सोडतीद्वारे विजेत्यांना वितरित करण्यात येणार आहेत, तर अल्प उत्पन्न गटातील ३० हजार ८२९ घरे उभारण्यात येणार असून यापैकी १७ हजार घरे म्हाडा दराप्रमाणे उपलब्ध होणार आहेत.

या घरांची किंमत २२ लाख ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. अत्यल्प गटातील विजेत्यांना २.५ लाखांची सवलत मिळणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी पीएमएवायचे अनुदान मिळणार नाही, तर अत्यल्प उत्पन्न गटातील विजेत्यांना मुद्रांक शुल्काची रक्कम एक हजार निश्चित करण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरे ३०६ चौरस फुटांची, तर अल्प उत्पन्न गटातील घर ३२० चौरस फुटांचे असणार आहे. अत्यल्प गटातील दोन हजार ५०० घरांची सोडत ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे. यासाठी https://surakshasmartcity.com/ या संकेतस्थळावर नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

राज्यात पंतप्रधान आवास योजनेतून राज्यभरात सुमारे १० लाख ६१ हजार ५०३ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी तीन लाख ३२ हजार २७३ घरांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर एक लाख ४० हजार २१७ घरांचे काम पूर्ण झाले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ५९ हजार ४१७ घरांचे काम या योजनेअंतर्गत सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06241 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top