कामात कुचराई करणारे १९ अधिकारी बडतर्फ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामात कुचराई करणारे १९ अधिकारी बडतर्फ
कामात कुचराई करणारे १९ अधिकारी बडतर्फ

कामात कुचराई करणारे १९ अधिकारी बडतर्फ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे अस्त्र वापरण्यास रेल्वे मंत्रालयाने सुरुवात केली आहे. रेल्वे मंत्रालयाने एकाच वेळी विविध विभागांतील १९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्या आहेत. ‘परफॉर्म करा किंवा घरी जा’ असा कडक संदेश देत रेल्वे मंडळाने कर्तव्यात अकार्यक्षमतेच्या अहवालाच्या आधारे १९ अधिकाऱ्यांच्या सेवा बंद केल्या आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला असून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत; तर कामचुकारपणा करणाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बडतर्फ केलेल्या १९ अधिकाऱ्यांपैकी एक भारतीय रेल्वे सेवा यांत्रिकी अभियांत्रिकीचा अधिकारी, दोन अधिकारी भारतीय रेल्वे कार्मिक सेवेतील, तीन अधिकारी भारतीय रेल्वे आरोग्य सेवेतील, एक भारतीय रेल्वे वाहतूक सेवेतील आहे; तर तीन भारतीय रेल्वे सेवा अभियंते आणि नऊ विद्युत अभियंत्यांचा त्यात समावेश आहे. मध्य रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे, उत्तर रेल्वे आणि इतर विभागांसह विविध झोनमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बडतर्फ केलेल्या १९ पैकी ९ रेल्वेचे अधिकारी अतिरिक्त आणि संयुक्त सचिव दर्जाचे होते.
...
७७ वरिष्ठांची स्वेच्छानिवृत्ती
मागील ११ महिन्यांत दोन सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसह भारतीय रेल्वेतील ७७ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सर्वाधिक स्वेच्छानिवृत्ती जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात आली. या महिन्यात ११ रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
-------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06242 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top