मुंबईत आज दीडशेहून अधिक रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत आज दीडशेहून अधिक रुग्ण
मुंबईत आज दीडशेहून अधिक रुग्ण

मुंबईत आज दीडशेहून अधिक रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईत कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या पुढे गेली. आज दिवसभरात १५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १० लाख ६१ हजार ३३२ झाली आहे. दरम्यान, आज केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे १९ हजार ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ८९८ रुग्ण उपचाराधीन असून आज दिवसभरात ११६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांपैकी १५२ रुग्ण लक्षणविरहित असून केवळ तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06245 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top