मुंबईत अर्ध्याहून अधिक जागा रिकाम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत अर्ध्याहून अधिक जागा रिकाम्या
मुंबईत अर्ध्याहून अधिक जागा रिकाम्या

मुंबईत अर्ध्याहून अधिक जागा रिकाम्या

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव ठेवण्यात येणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली. यात मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये आरटीईच्या अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. असंख्य शाळांनी पालकांना प्रवेश देण्यास मज्जाव केल्याने शेकडो पालकांची निराशा झाली.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात यंदा आरटीई प्रवेशासाठी ३४१ शाळांनी नोंदणी केली होती. त्या शाळांमध्ये सहा हजार ४५१ जागा या प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्या जागांवरील प्रवेशासाठी तब्बल १५ हजार ५० अर्ज आले होते. त्यापैकी शिक्षण विभागाने पहिल्या फेरीसाठी केवळ पाच हजार ३४३ जागांसाठी लॉटरी जाहीर केली. त्यातील अखेरच्या दिवशी केवळ तीन हजार २५७ जागांवर प्रवेश झाले असून, उर्वरित दोन हजार ८६ जागा रिक्त राहिल्या आहेत; तर ज्या जागा लॉटरीत समाविष्ट करण्यात आल्या नव्हत्या त्या एक हजार १०८ जागाही शिल्लक राहिल्या आहेत.

प्रवेश नाकारला!
मुंबई आणि परिसरात खासगी व्यवस्थापनाच्या, तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पाच हजार १८१ जागा उपलब्ध होत्या; तर केंद्रीय आणि इतर मंडळाच्या खासगी शाळांमध्ये एक हजार १७० जागा उपलब्ध होत्या. यामध्ये पहिल्या प्रवेश फेरीत केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्येच सर्वाधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यात सरकारने केलेल्या शुल्ककपातीमुळे अनेक शाळांनी प्रवेश नाकारल्याचे पालकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06251 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top