मुंबईत आदिवासी संस्कृतीचा चित्ररुपी नजराणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत आदिवासी संस्कृतीचा चित्ररुपी नजराणा
मुंबईत आदिवासी संस्कृतीचा चित्ररुपी नजराणा

मुंबईत आदिवासी संस्कृतीचा चित्ररुपी नजराणा

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : आदिवासी चित्रकला कायमच मनाला भुरळ घालते. देशातील प्रत्येक राज्यात या चित्रकलेचे, चित्रांचे असंख्य वैशिष्ट्ये नजरेस पडतात आणि ते आकर्षित करून निसर्ग आणि मानवी जीवनातील वास्तव मांडतात. असेच देशभरातील आदिवासी चित्रकलेचे वास्तव मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या एका प्रदर्शनातून अनुभवायाला मिळत आहेत. हे प्रदर्शन सोमवार, १६ मेपर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्रातील आणि विशेषत: पालघर, ठाणे जिल्ह्यातील वारली कलेपासून ते मध्य प्रदेशातील गोंड-भील, गुजरामधील पिठोरा, तेलंगणातील बंजारा चित्र, ओरिसातील सौरा आणि झारखंडमधील संथाल अशा असंख्य आदिवासी चित्रकला आणि त्यांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू आहे. या चित्र प्रदर्शनात देशातील आठ राज्यांतील १२ आदिवासी चित्रकारांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तांदळाचे पीठ, शेण, विविध रंगांच्या मातीपासून ते विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती, साहित्य आणि रंगांचा, तसेच बांबूच्या काडीसह ब्रशचाही वापर करून कापड, कॅनव्हासवर ही चित्रे साकारण्यात आली आहेत. ओरिसातील सौरा आदिवासी चित्र, तसेच झारखंड येथील संथाल प्रकारातील चित्रही येथे येणाऱ्यांना आकर्षिक करत आहेत.
केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाने हे प्रदर्शन भरवले आहे. यात डहाणू तालुक्यातील कोशीसरी गावातील अंकुश करमोडा यांच्या वारली चित्रांनी एक वेगळे आकर्षण निर्माण केले आहे. ते या प्रदर्शनातच चित्र साकारत आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांचे चित्र पहिल्यांदाच लागल्याने त्यांना याचा खूप अभिमान वाटत आहे. मागील १२ वर्षांपासून ते वारली चित्रकार म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत सुमारे २० हजारांहून अधिक वारली चित्रे काढली आहेत.


शाळेत असताना `चौक` हे वारली चित्र काढले होते. तिथूनच माझ्या चित्रकाराच्या प्रवासाला सुरुवात झाली. लग्नकार्यात चौक काढण्याची कामे मिळू लागली आणि पुढे कोणत्याही कला महाविद्यालयात शिक्षण न घेता मी चित्रकार बनलो. आज असंख्य चित्र खरेदी केली जात असल्याने त्यावरच मी पूर्णपणे अवलंबून आहे. वारली चित्रकला आमचा आत्मा आहे. तो कायम निसर्ग, मानवी जीवनातील विविध भाव आणि प्रतिबिंबातून चित्रित झाला पाहिजे.
- अंकुश करमोडा, वारली चित्रकार, पालघर.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06254 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top