आरोपींच्या शिक्षणासाठी खटला बालन्यायालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपींच्या शिक्षणासाठी खटला बालन्यायालयात
आरोपींच्या शिक्षणासाठी खटला बालन्यायालयात

आरोपींच्या शिक्षणासाठी खटला बालन्यायालयात

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : एका संगीतकाराच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींच्या शिक्षणासाठी त्यांचा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन्ही आरोपींसाठी स्वतंत्रपणे दोन सामाजिक संस्थांनी अर्ज केला होता.

मृत्यू झालेल्या व्यक्तीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आरोपीने केला होता. त्यामुळे तिला बाल सुरक्षा कायद्यानुसार संरक्षण आणि देखभालीची आवश्यकता आहे. यासाठी प्रयास संस्थेत ती असून अतिशय हुशार आणि मेहनती मुलगी आहे, असे न्यायालयात सांगण्यात आले. तिच्यासाठी नर्सिंगचा अभ्यासक्रम देण्याचा विचार असून जर ती पुढे शिकली तर ती ताणातून बाहेर पडू शकेल, असा युक्तिवाद करण्यात आला. अन्य आरोपीनेही शिक्षण घेण्याची मागणी केली आहे. घटनेच्या वेळी तो दहावीत होता आणि नोकरी करत होता. आता भविष्यात शिकून कुटुंबाला मदत करण्याचा विचार तो करत आहे. यासाठी आशियान फाऊंडेशनची मदत त्याला मिळाली आहे. विशेष न्या. कल्पना पाटील यांनी दोन्ही संस्थांचे अहवाल तपासले आणि दोघांचे खटले बाल न्यायालयात वर्ग केले.

आरोपींची शिकण्याची इच्छा
हत्येसारखा गंभीर गुन्हा असला तरी आरोपींनी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि ते दोघे हुशार आहेत. त्यामुळे प्रौढांप्रमाणे त्यांच्यावर खटला चालवण्याऐवजी त्यांचा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात येईल, बाल संरक्षण कायद्याच्या दृष्टीने यामधून दोन्ही आरोपींचे संरक्षणदेखील केले जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06255 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top