लैंगिक शोषणातील आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sexual abuse of minor girl mumbai
लैंगिक शोषणातील आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता

लैंगिक शोषणातील आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता

मुंबई : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या युवकाला विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. तक्रारदार पीडित मुलीच्या बाळाचे आणि आरोपीचे डीएनए भिन्न असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे, त्यामुळे मुलाने पीडितेचे शोषण केले नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला.

मुलीने खोटी माहिती देऊन आरोपीला यामध्ये गोवल्याचा दावा आरोपीने केला होता. २०१७ मध्ये पीडित मुलगी गर्भवती असल्याचे तिच्या पालकांना आढळले. तेव्हा मुलीने आरोपीचे नाव घेऊन तीन वर्षे तो लैंगिक शोषण करत आहे, असा आरोप केला होता. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याआधारे आरोपीला अटक करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06257 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top