डॉ. कलाश्री बर्वे यांचे ‘अध्यात्म संकेत’ चित्ररूपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. कलाश्री बर्वे यांचे ‘अध्यात्म संकेत’ चित्ररूपात
डॉ. कलाश्री बर्वे यांचे ‘अध्यात्म संकेत’ चित्ररूपात

डॉ. कलाश्री बर्वे यांचे ‘अध्यात्म संकेत’ चित्ररूपात

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : आंतरिक ऊर्जेचे प्रकटीकरण करण्यासाठी आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभाव टाकणाऱ्या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरले आहे. लेखिका, चित्रपट कला दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रकार डॉ. कलाश्री बर्वे यांनी आपल्या कुंचल्यातून ही चित्रे रेखाटली आहेत. ‘अध्यात्माचे संकेत’ या नावाने हे समकालीन चित्र प्रदर्शन भरले असून ते १६ मेपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात अध्यात्म आणि त्यासंदर्भातील विविध आकाराची आणि कन्टेंटपरी आर्टची ११० चित्रे मांडण्यात आली आहेत.
डॉ. बर्वे म्हणाल्या की, या प्रदर्शनाचे नाव मी ‘अध्यात्माचे संकेत'' असे ठेवलेले आहे. हे प्रदर्शन हा माझ्यासाठी अध्यात्माचा एक थांबा आहे. मला एखादा आकार किंवा एखाद्या वस्तूचे रूप खुणावते तेव्हा खरे तर त्या वस्तूचे त्या अंतर्गत आकाराचे अंतर्गत सत्त्वरूप मला जाणवते. मी त्या आकाराचे ते आत्मस्वरूप माझ्या रंगरेषांतून प्रकट होण्याचा प्रयत्न करत असते. ती मला झालेली अनुभूती असते. माझ्यासाठी ज्या गोष्टीचे कलेतून प्रकटीकरण म्हणजे माझ्या स्वतःच्या आत डोकावून पुन्हा त्या गोष्टीच्या चित्ररूपाद्वारे माझ्यातल्या आत्मस्वरूपाला प्रकट करणे. पण हा माझा दृष्टिकोन झाला. प्रत्येक कलाकार त्यांच्या त्यांच्या अनुभूतीद्वारे व्यक्त होत असल्याचे त्या म्हणाल्या.
...
ब्रह्मांड आणि त्यातील सहा तत्त्वे...
डॉ. बर्वे यांच्या अनेक चित्रांतून ब्रह्मांड आणि त्यातील सहा तत्त्वे दिसतात. त्यांच्या एका शिवलिंगरूपी चित्रात सर्व ब्रह्मांड हे प्रतीत होताना दिसते. दुसऱ्या एका चित्रात स्त्री मातेचे चित्र रेखाटण्यात आले असून त्यात तिच्या गळ्यात असलेले मंगळसूत्र हे शिवलिंगाचे प्रतीक आणि त्याचे झालेले रूपांतर दिसून येते. स्त्री ही शक्ती आहे आणि शिव हा तिच्यासोबत असतो. अनेक चित्र निरखून पाहिल्यास एकाच वेळी शिव आणि मागे हिमालयाचे एक प्रतिबिंब आकाशात ब्रह्मांडात विलीन झाल्यासारखा भास होतो.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06258 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top