राज्यात २४८ नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात २४८ नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू
राज्यात २४८ नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

राज्यात २४८ नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्यात मंगळवारी २४८ नव्या कोरोना रुग्णांची; तर एका मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८०,५८५ झाली आहे; तर राज्यात शनिवारी २६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी १,४३९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सक्रिय रुग्णही वाढत असून राज्याची चिंता वाढली आहे. शनिवारी एका मृत्यूच्या नोंदीसह आतापर्यंत राज्यात एकूण १,४७,८५४ एवढे मृत्यू नोंदवले गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०५,३७,५०२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८०,५८५ (९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06259 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top