दिवसभरात१३१ कोरोनारुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरात१३१ कोरोनारुग्णांची नोंद
दिवसभरात१३१ कोरोनारुग्णांची नोंद

दिवसभरात१३१ कोरोनारुग्णांची नोंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी (ता. १४) दिवसभरात १३१ नवे कोरोना रुग्ण आढळले. आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १,०६१,४६३ झाली आहे. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृतांची संख्या १९,५६५ झाली आहे.

सध्या शहर उपनगरात ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात १७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण १,०४१,०४१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांपैकी १२८ रुग्ण लक्षणविरहित असून तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली आहे. शहर उपनगरातील २४ हजार ९५९ खाटांपैकी केवळ २५ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५५६ दिवसांवर येऊन ठेपला आहे; तर ६ ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००७ टक्क्यांवर आहे. पालिकेने मागील २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील एकूण १,१२९ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. मुंबईत एकूण १,०६१,४६३ कोरोनाबाधित असून मृतांची संख्या १९ हजार ५६५ इतकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06261 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top