मुंबई सेंट्रल ते गांधीनगर एक्स्प्रेसला दोन विस्टाडोम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर एक्स्प्रेसला दोन विस्टाडोम
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर एक्स्प्रेसला दोन विस्टाडोम

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर एक्स्प्रेसला दोन विस्टाडोम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर शताब्दी एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्त्वावर विस्टाडोम डबा मागील महिन्यात जोडण्यात आला. या डब्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पश्चिम रेल्वेने आता १७ मेपासून या एक्स्प्रेसला कायमस्वरूपी दोन विस्टाडोम डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आता तिकीट बुकिंगवेळी मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२००९/१० ला १७ मेपासून दोन विस्टाडोम डबे कायमस्वरूपी जोडले जाणार आहेत. १६ मेपर्यंत या एक्स्प्रेसला तात्पुरत्या कालावधीसाठी एक विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. या विस्टाडोम डब्यात ४४ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. या डब्यातून प्रवाशांचा प्रवास खूप आनंदमय होत आहे. या डब्याला काचेच्या मोठ्या खिडक्या, काचेचे छत, ३६० डिग्री फिरणारी आसने, एक ऑब्‍जर्वेशन लाउंज आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना मनमुराद प्रवास घडतो. विस्टाडोम डब्यांची बुकिंग आता शताब्दी एक्स्प्रेसच्या अन्य डब्यांसह एकीकृत करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२००९/१० मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेस पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासह गाडीचे थांबे, वेळापत्रक ही माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06263 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top