
सीए, सीएसच्या नव्या निकषांमुळे प्राध्यापकांपुढे अडचणी
मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने सीए, सीएस आणि आयसीडब्ल्यूए ही पदव्युत्तर पदवी एम.कॉम समकक्ष ठरवल्याने राज्यातील अनेक प्राध्यापकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच काही महाविद्यालयांनी यूजीसी आणि विद्यापीठ नियमांनुसार देण्यात येणारे लाभच रोखून धरल्याने यूजीसीने याबाबत स्पष्टता आणण्याची मागणी महाराष्ट्र युनियन ऑफ सेक्युलर टीचर (मस्ट) या संघटनेने केली आहे. यूजीसीने नुकतेच सीए, सीएस आणि आयसीडब्ल्यूए ही पदव्युत्तर पदवी एम.कॉम समकक्ष केली.
यामुळे राज्यातील विद्यापीठांमध्ये १९९५ आणि त्यानंतरच्या कालावधील सीएची पदवी घेऊन प्राध्यापक म्हणून रुजू झाले आहेत, अशा प्राध्यापकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच ज्या प्राध्यापकांनी आतापर्यंत केवळ सीए, सीएस अशी पदवी घेऊन आपली सेवा कायम ठेवली आहे आणि ज्यांनी त्यानंतर सेट-नेट केले आहे, त्यांना काही महाविद्यालयांकडून अनेक प्रकारचे लाभ देण्यासाठी आडकाठी आणली जात आहे. सीए, सीएस आणि आयसीडब्ल्यूए आता एमकॉम समकक्ष असल्याने संबंधित प्राध्यापकांना सेट-नेट होणे आवश्यक असल्याचेही काहींचे म्हणणे आहे, तर जे प्राध्यापक पूर्वीच्या नियमानुसार कार्यरत आहेत, त्यांचे कोणतेही लाभ रोखले जाऊ नये, याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी ‘मस्ट’ने केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06302 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..