अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court
अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी याचिका

अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी याचिका

मुंबई : बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. सुटीकालीन न्या. नितीन सांब्रे आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेऊन जे.जे. शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

मुलीच्या वतीने तिच्या वडिलांनी ही याचिका केली आहे. ती अल्पवयीन आहे आणि या सर्व प्रकारामुळे मानसिक ताण सहन करत आहे. त्यामुळे तिला गर्भपात करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती १३ आठवड्यांची गर्भवती आहे. या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक झाली नसून तो फरार आहे. खंडपीठाने याचिकेवर २३ मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. त्या वेळी वैद्यकीय पथकाला अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06350 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top