मुंबईतील तापमान स्थिर; पण आर्द्रता वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील तापमान स्थिर; पण आर्द्रता वाढली
मुंबईतील तापमान स्थिर; पण आर्द्रता वाढली

मुंबईतील तापमान स्थिर; पण आर्द्रता वाढली

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा लागत होत्या. सध्या मात्र कमाल तापमान स्थिर असल्याचे दिसते. किमान तापमानात किंचित वाढ झाली असून रात्री हवेतील आर्द्रता वाढत असल्याने उष्मा जाणवत आहे. अस्वस्थता जाणवत आहे. शुक्रवारी रात्री कुलाब्यात २८.५ आणि सांताक्रूझमध्ये २७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात काहीशी वाढ झाली असून कुलाबा ८१ आणि सांताक्रूझमध्ये ६९ टक्के इतकी आर्द्रता नोंदवण्यात आली आहे. शनिवारी कुलाब्यात ३३.५ आणि सांताक्रूझमध्ये ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात अनुक्रमे ७.९ व ११.३ अंश सेल्सिअस घट झाली आहे; मात्र रात्री हवेत आर्द्रता कायम आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06368 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..