मेधा सोमय्यांचा राऊत यांच्याविरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेधा सोमय्यांचा राऊत यांच्याविरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा
मेधा सोमय्यांचा राऊत यांच्याविरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा

मेधा सोमय्यांचा राऊत यांच्याविरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा

sakal_logo
By

मुंबई, ता.२३ : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामधील शाब्दिक सामना आता मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी मुंबई उच्च न्यायालयात राऊत यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा आणखी एक मानहानीचा दावा आज दाखल केला. सुमारे शंभर कोटींच्या कथित टॉयलेट गैरव्यवहाराच्या आरोपांविरोधात मेधा सोमय्या न्यायालयात गेल्या आहेत.

राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या सामाजिक संस्थेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रात टॉयलेट बांधणीच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्याबाबत प्रा. मेधा सोमय्या यांनी यापूर्वी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी पुढील महिन्यात नियमित न्यायालयात होण्याची शक्यता आहे. राऊत यांना शंभर कोटींची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचे आदेश द्यावेत आणि यापुढे सोमय्या कुटुंबीयांविरोधात आरोप करण्यास मनाई करावी, अशी मागणी दाव्यात करण्यात आली आहे.

आज उच्च न्यायालयात हजेरी लावून मेधा सोमय्या यांनी आणखी एक दावा दाखल केला. या वेळी माजी खासदार किरीट सोमय्याही उपस्थित होते. आरोपांमुळे माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा मलीन झाली आहे. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राऊत यांनी आधारहिन आणि धादांत खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर खटल्याची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06394 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..