
आयआयटी मुंबईत एमडीपी अभ्यासक्रम
आयआयटी मुंबईत एमडीपी अभ्यासक्रम
मुंबई, ता. २४ : देशातील विविध महाविद्यालयांमध्ये इंजिनियरिंगचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता आयटी मुंबईमध्ये मास्टर इन डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस (एमडीपी) अभ्यासक्रम करता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयटी मुंबईकडून नुकतेच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत अर्ज करता येतील.
एमडीपी हा एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फोर रुरल एरियास (सीटीएआरए) आणि आयआयटी मुंबईने तो सुरू केला असून तो यंदाच्या नवीन वर्षात सुरू होणार आहे यासाठी नुकतीच प्रवेश प्रक्रिया https://www.iitb.ac.in/newacadhome/mdp.jsp या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.
देशभरातील विविध विकास कामे आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तज्ञांची गरज आहे. मात्र त्या प्रमाणात ते उपलब्ध होत नाहीत त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तज्ञ उपलब्ध करून देण्यासाठी एमडीपी एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या अभ्यासक्रमासाठी तीन लाखांहून अधिक रुपयांचे शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. तर दुसरीकडे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना संकुलातील वस्तीगृहात राहण्याची मुभा ही मिळणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06407 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..