आठवड्यातून दोनदा वृद्ध दाम्पत्याची काळजी घ्यावी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवड्यातून दोनदा
वृद्ध दाम्पत्याची काळजी घ्यावी!
आठवड्यातून दोनदा वृद्ध दाम्पत्याची काळजी घ्यावी!

आठवड्यातून दोनदा वृद्ध दाम्पत्याची काळजी घ्यावी!

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : दादरमध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीचा छळ त्यांच्या सुनेकडून होऊ नये, यासाठी दादर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे त्यांच्या घरी जाऊन पाहणी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण मंचने सून आणि त्यांच्या मुलांना सासू-सासऱ्यांचा तीन बीएचके फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले; मात्र त्यामुळे सून आणि तिची मुले वृद्ध दाम्पत्यांचा छळ करतात. आमचा मुलगा नालासोपारामध्ये राहतो. सून खूप छळ करत असून ती अशीच आमच्या घरात राहिली, तर आमचे जगणे कठीण होईल, असे सासूने न्यायालयात सांगितले. न्या. मिलिंद जाधव यांनी तूर्तास मंचच्या आदेशाला ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे; मात्र याचा अर्थ सुनेला जागेत हक्क मिळाला आहे असे नाही, तर जागा सासूच्या नावावरच आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दादर पोलिस ठाण्यातील एक महिला पोलिस निरीक्षक आणि हवालदाराने दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी दहा ते बारा या दरम्यान ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरी जाऊन विचारपूस करावी आणि दोघाच्या देखभालीवर पोलिसांनी लक्ष द्यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सुनेने कोणत्याही परिस्थितीत सासू सासऱ्यांना त्रास देऊ नये, असे आदेशही न्यायालयाने दिले. तसेच दोन्ही पोलिसांनी त्यांचे फोन क्रमांक दापत्याला द्यावेत, असे सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06417 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top