दरडछायेतील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरडछायेतील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा
दरडछायेतील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा

दरडछायेतील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : पावसाळ्यात दरड कोसळण्याची टांगती तलवार असणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेने नोटिसा बाजावण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या केवळ ‘एस’ विभागात तब्बल २३ पेक्षा अधिक ठिकाणे ही धोकादायक असल्याचे पालिकेने म्हटले आहे. येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टीवेळी दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे या भागातील धोकादायक इमारतींना/झोपड्यांना ‘एस’ विभाग कार्यालयातर्फे सावधगिरीच्या व सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित परिसरातील इमारती-झोपड्यांमधील रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना, जीवित अथवा वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे सहाय्यक आयुक्त ‘एस’ विभागातर्फे सांगण्यात आले.

या भागांचा समावेश
‘एस’ विभागातील विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतमगर; तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गावदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कम्पाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी आदी ठिकाण टेकडी/डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना पालिकेने नोटिसा दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06438 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top