विद्यार्थ्यांना मिळणार टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना मिळणार टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण
विद्यार्थ्यांना मिळणार टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण

विद्यार्थ्यांना मिळणार टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्य करणारी बायजूस संस्था व बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्‍यात आला. दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) झालेल्या या करारामुळे बृहन्मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बायजूस संस्थेचे ‘लर्निंग ॲप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत; तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करणाऱ्या शिक्षकांनादेखील बायजूस संस्थेद्वारे प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग आणि खनिकर्म खात्याचे मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह आणि बायजूस संस्थेचे बायजू रवींद्रन हे दावोसमध्ये उपस्थित होते, तर बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.
विद्यार्थ्यांसाठी सोयी उपलब्‍ध
बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, टॅब, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, ॲस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत- कला- क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे अध्ययन व अध्यापन अविरतपणे करण्यात येत आहे. याच शृंखलेत बायजूस या संस्थेसोबतच्या सामंजस्य कराराच्या निमित्ताने आणखी एक पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06451 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top