मुंबईत दिवसभरात ३५० रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवसभरात ३५० रुग्णांची नोंद
मुंबईत दिवसभरात ३५० रुग्णांची नोंद

मुंबईत दिवसभरात ३५० रुग्णांची नोंद

sakal_logo
By

मुंबई, ता.२६ : मुंबईतील कोविड रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून जवळपास तीन महिन्यांनंतर गुरुवारी एका दिवसातील मोठी वाढ नोंदवण्यात आली. गुरुवारी ३५० कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली. एकाही मृत्यूची नोंद झाली नसली तरी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात एकूण १६ रुग्णांना दाखल करण्यात आले.

दिवसभरात २२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १०,६३,९२१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांपैकी १०,४२,६९७ रुग्ण बरे झाले आहेत. १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत एक हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत.

शहर-उपनगरांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ३६९१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत वा झोपडपट्टी सध्या सील नाही. गेल्या आठवडाभरातील कोरोना वाढीचा दर ०.०१७ टक्के इतका आहे. मुंबईत नोंदवण्यात आलेल्या ३५० पैकी ३३४ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८७ खाटा आहेत. त्यापैकी ६४ खाटांवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक खाटा रिक्त आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06459 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top