खोट्या गुन्‍ह्यात अडकवण्याची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोट्या गुन्‍ह्यात अडकवण्याची तयारी
खोट्या गुन्‍ह्यात अडकवण्याची तयारी

खोट्या गुन्‍ह्यात अडकवण्याची तयारी

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : शिवसेना व महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार मी सतत बाहेर काढत असल्यामुळे, मला खोट्या आरोपात गुंतवण्याचे आदेश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिसांना दिल्याचा खळबळजनक आरोप अंधेरी पश्चिम येथील भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यांनी आज येथे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा आरोप केला आहे. गणेश नाईक, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींवर राज्य सरकारने अनेक प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आता आपलाही क्रमांक लागेल, अशी भीती साटम यांनी व्यक्त केली आहे.
आपण गेली दोन वर्षे महापालिका व महाविकास आघाडी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढत असून कोरोना कामातील गैरप्रकाराविरुद्धही आपण सातत्याने आवाज उठवला आहे. महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपने हाती घेतलेल्या पोल-खोल अभियानाचे संयोजक म्हणूनही आपण काम केले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे अनेक लोक नाराज झाले आहेत. त्यामुळे मला खोट्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा आदेश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिसांना दिल्याचे मला खात्रीलायक सूत्रांकडून कळल्याचे साटम यांनी म्हटले आहे.
मात्र आपण अशा दबावाला बळी पडणार नसून जनतेप्रति असलेल्या जबाबदारीचे पालन करतच राहू. तसेच नवी मुंबई घडवण्यासाठी आपण कायम झटत राहू, असेही साटम यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06480 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top