टाटा पॉवर रिन्यूएबल्सचा परतूरमध्ये वीज प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा पॉवर रिन्यूएबल्सचा परतूरमध्ये वीज प्रकल्प
टाटा पॉवर रिन्यूएबल्सचा परतूरमध्ये वीज प्रकल्प

टाटा पॉवर रिन्यूएबल्सचा परतूरमध्ये वीज प्रकल्प

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये महावितरण कंपनीसाठी १०० मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प सुरू केला आहे. या उभारणीमध्ये ४ लाख ११ हजार ९०० पेक्षा जास्त मोनोक्रिस्टलाइन पीव्ही मोड्यूल्सचा समावेश असून, यामुळे दरवर्षी सुमारे २३४ मिलियन टन कार्बन उत्सर्जनात घट होण्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी ६०० एकर जमिनीवर करण्यात आली आहे. टीपीआरईएल अभियंत्यांच्या तज्‍ज्ञ टीमने या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी अतिशय कमी वेळात, समन्वयपूर्वक कामे पार पाडली. प्रकल्पाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये टीमने सीएमसीएस, स्विचयार्ड आणि पीव्ही एरियाची सर्व सिव्हिल कामे केली; तर त्यानंतर दीड महिन्यात एमएमएस उभारणीपैकी ६० मेगावॉट पीक आणि मोड्यूल उभारणीच्या ५० मेगावॉट पीक यांच्यासह सर्व ब्लॉक्सचे एसी रेडीनेस पूर्ण केले.
प्रकल्पांचे काम विविध स्तरांवर सुरू
मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पामुळे १०० टाटा पॉवरची ऊर्जा क्षमता ३ हजार ६२० मेगावॉट असून यापैकी २६८८ मेगावॉट सौर आणि ९३२ मेगावॉट पवन ऊर्जा आहे. टाटा पॉवरची एकूण ऊर्जा क्षमता ४ हजार ९२० मेगावॉट असून त्यापैकी १३०० मेगावॉट क्षमतेच्या शुद्ध ऊर्जा प्रकल्पांचे काम विविध स्तरांवर सुरू आहे.

कोट
प्रकल्पामुळे महाराष्ट्राला राज्याच्या एकूण ऊर्जा क्षमतेमध्ये शुद्ध ऊर्जेचे प्रमाण वाढवून, भारताच्या महत्त्वाकांक्षी शुद्ध ऊर्जा उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये योगदान देण्यात मदत मिळेल.
- डॉ. प्रवीर सिन्हा, टाटा पॉवरचे सीईओ, एमडी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06485 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top