परिचारिकांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिकांचे आजपासून 
बेमुदत कामबंद आंदोलन
परिचारिकांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

परिचारिकांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ ः राज्य सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांची आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आज (ता. २७) संचालकांशी बैठक झाली; मात्र या बैठकीतही चर्चा निष्फळ ठरल्याने उद्यापासून (ता. २८) बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे परिचारिकांकडून सांगण्यात आले. आमच्या मागण्यांबाबत लेखी स्वरूपात ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाईल, असे आंदोलक परिचारिकांनी सांगितले.
खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून पाच दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन पुकारण्यात आले आहे. खासगीकरणाच्या निर्णयातून परिचारिकांना वगळण्याची मागणी संघटनेकडून केली जात आहे. यापूर्वीही शासनाने परिचारिकांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर सर्व मागण्या तत्त्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र ते कागदावरच राहिले. आता लेखी आश्वासनाशिवाय कामावर रुजू होणार नसल्याचा इशारा परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06490 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top