झोपडीधारकांच्या तक्रारींचे निरसन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपडीधारकांच्या तक्रारींचे निरसन
झोपडीधारकांच्या तक्रारींचे निरसन

झोपडीधारकांच्या तक्रारींचे निरसन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पुढाकार घेतला आहे. यासाठी पाच अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून हे अधिकारी दररोज कार्यालयात झोपडीधारकांची गाऱ्हाणी ऐकून घेत आहेत. यामुळे झोपडीधारकांचे प्रश्न मार्गी लागू लागले आहेत.
शहर आणि उपनगरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहेत. या योजनांमधील अनेक प्रकल्प रखडले आहेत. विकसक भाडे देत नाहीत, यामुळे झोपडीधारकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. विकसकांविरोधात तक्रारी करण्यासाठी झोपडीधारक एसआरए कार्यालयात धाव घेतात; मात्र अधिकारी वेळेत भेटत नसल्याने झोपडीधारकांना निराश होऊन परतावे लागते. अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नसल्याने झोपडीधारक मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत होते. झोपडीधारकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखेर मुख्य अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

...असा निघतो मार्ग
- दररोज एक अधिकारी आणि विभागाचे कर्मचारी झोपडीधारकांचे प्रश्न ऐकून घेतात.
- धोरणात्मक विषयावर अधिकारी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतात.
- परिणामी झोपडीधारक मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार घेऊन येण्याचे प्रमाण घटले आहे.
- तक्रार अधिकारी दररोज दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत मीटिंग हॉलमध्ये भेटतात.
- तक्रारदारांचे निरसन एकाच ठिकाणी होते, असे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06491 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top