अभिमत विद्यापीठे शुल्क नियमनाच्या कायद्यात येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिमत विद्यापीठे शुल्क नियमनाच्या कायद्यात येणार
अभिमत विद्यापीठे शुल्क नियमनाच्या कायद्यात येणार

अभिमत विद्यापीठे शुल्क नियमनाच्या कायद्यात येणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : राज्यातील खासगी संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या अभिमत विद्यापीठांना शैक्षणिक नियमनाच्या कायद्याखाली आणले जाणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ या विद्यापीठ कायद्यात त्यासाठी असलेल्या नियमात स्पष्टता नसल्याने त्यांचे शुल्क निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून हालचाली सुरू आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या अधिनियम क्रमांक १०१ अन्वये शुल्कनिश्चिती समिती स्थापन केली जाते. ही समिती प्रामुख्याने विनानुदानित तत्त्वावर अथवा खासगी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कनिश्चितीचे नियमन करते; मात्र ही समिती स्वायत्त परिसंस्था, अभिमत विद्यापीठे यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रम आणि त्यांचे शुल्क यावर कोणताच निर्णय घेत नाही. त्यामुळे अभिमत, स्वायत्त संस्थांकडून वाटेल त्याप्रमाणे शुल्क आकारले जाते. त्यामुळे त्यावर अंकुश आणला जावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने लावून धरली आहे. यासाठी नुकतेच संघटनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन याविषयी कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ कायद्यातील नेमक्या त्रुटी लक्षात घेऊन स्वायत्त महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठाचा शुल्क नियमनावर सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती विभागातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली.

वेळोवेळी पाठपुरावा
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार शुल्कनिश्चिती समित्या अत्यंत महत्त्वाच्या असतात; परंतु अभिमत विद्यापीठांना त्यासाठी कोणताच वचक उरलेला नाही. त्यामुळे त्यावर अंकुश आणला जावा, यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06501 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top