शिक्षणात ‘खासगी‘ हस्तक्षेपाची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणात ‘खासगी‘ हस्तक्षेपाची भीती
शिक्षणात ‘खासगी‘ हस्तक्षेपाची भीती

शिक्षणात ‘खासगी‘ हस्तक्षेपाची भीती

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : कोरोनाकाळात दर्जेदार ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाला आता एका खासगी संस्थेच्या ऑनलाईन शिक्षणाची मदत घ्यावी लागत आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारावर विभागातील आजी-माजी शिक्षणाधिकारी आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने ऑनलाईन शिक्षणासाठी आतापर्यंत अनेक प्रयोग राबवले आहेत. आता या प्रयोगात खासगी कंपन्यांचा हस्तक्षेप वाढेल की काय, अशी भीती शिक्षक व्यक्त करत आहेत.

पालिका शिक्षण विभागाने कोरोनाकाळात प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी अनेक प्रयोग राबवले होते. त्यामध्ये विविध यूट्यूब, झूम यांचा आदींचा वापर करत तब्बल ४० प्रकारचे चॅनेल्स आणि इतर ऑनलाईन साधने उपलब्ध केली होती. आठ माध्यमांसाठी प्रत्येक विषयाला तज्ज्ञ आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली स्वतंत्ररीत्या विकसित केली होती. राज्य सरकारने या कार्याची दखल घेत राज्यातील सर्व सरकारी शाळांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मुंबई पालिका शिक्षण विभागाने विकसित केलेल्या चॅनल्सचा वापर करावा, असे आदेश दिले होते. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्ररीत्या जीआरही जारी केला होता.

अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये पालिका शिक्षण विभागातील तंत्रस्नेही शिक्षकांनी अनेक प्रकारचे प्रयोग करून शाळा डिजिटल करण्याकडे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याकडे भर दिलेला आहे. अशा परिस्थितीत पालिका शिक्षण विभागाने ‘बायजुज’ या खासगी कंपनीसोबत ऑनलाईन शिक्षणासंदर्भात नुकताच करार केला आहे. त्यावर तंत्रस्नेही शिक्षक आणि अधिकारीवर्गात मात्र नाराजी आहे.

तूर्तास आर्थिक भार नाही
बायजूज सोबत कराराच्या माध्यमातून महापालिका शिक्षण विभागाला तूर्तास कोणताही आर्थिक भार सोसावा लागणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पुढील काळामध्ये या कंपनीची पालिका शिक्षण विभागामध्ये घुसखोरी वाढेल, अशी भीती आजी-माजी अधिकारी वर्गातून व्यक्त केली जात आहे; तर दुसरीकडे तंत्रस्नेही शिक्षकांकडून केल्या जात असलेल्या प्रयोगांना आळा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06506 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top