
मुंबईत तीन महिन्यांतील सर्वाधिक ३१८ रुग्णांची नोंद
मुंबई, ता. ३० ः मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी ३१८ नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. सोमवारी शून्य मृत्यूची नोंद झाली. आज सापडलेल्या रुग्णांची संख्या तीन महिन्यांतील सर्वाधिक संख्या आहे. रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवसभरात एकूण २० रुग्ण दाखल करण्यात आले. सोमवारी १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आतापर्यंत एकूण १०,६५,२९६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांपैकी १०,४३,४९२ रुग्ण बरे झाले आहेत. १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २ हजार २३८ सक्रिय रुग्ण आहेत. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी २६१५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत वा झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१७ टक्के इतका आहे. मुंबईत नोंदवण्यात आलेल्या ३१८ रुग्णांपैकी २९८ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४७२ खाटा आहेत. त्यांपैकी ९८ खाटांवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक खाटा रिक्त आहेत.
राज्यात कोरोनाचे ४३१ नवीन रुग्ण
मुंबई, ता. ३० ः सोमवारी राज्यात ४३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात कोरोनाच्या ७८,८६,३७५ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी राज्यभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या २९७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ७७,३५,३८५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आताही ९८.१० टक्क्यांवर कायम आहे.
राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार १३१ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण केवळ ९.७८ टक्केच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात सोमवारी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या १,४७,८५९ वर स्थिर आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06534 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..