
आरे मार्गावर प्राण्यांसाठी १८ अंडरपास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई महापालिकेकडून सध्या आरे रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मोरारजी नगरला जोडणारा ७.२ किलोमीटरचा हा मार्ग असून ८ मीटर रुंद आहे. या रस्त्याचे काम करताना प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत असून, या अंतर्गत प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी १८ अंडरपास तयार करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात तीन अंडरपास तयार करण्यात येत आहेत.
आरे मार्ग हा दिनकरराव देसाई या नावानेही ओळखला जातो. आरे परिसराला लागून घनदाट जंगल असल्याने या परिसरात अनेक जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे. बिबटे, हरण, जंगली मांजर, मुंगूस आणि विविध प्रकारचे साप येथे आढळतात. त्यांचे वास्तव्य याच परिसरात असल्याने प्राण्यांची जंगल परिसरात भटकंती सुरू असते. रस्ता बनवताना प्राण्यांची काळजी घेण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. म्हणूनच काँक्रीटचा रस्ता तयार झाल्यानंतर प्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी अंडरपासची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पाण्याचा निचरा होण्यासाठी जलवाहिन्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06543 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..