आरटीईअंतर्गत प्रवेश संथगतीनेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीईअंतर्गत प्रवेश संथगतीनेच
आरटीईअंतर्गत प्रवेश संथगतीनेच

आरटीईअंतर्गत प्रवेश संथगतीनेच

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : शिक्षण हक्क कायद्यानुसार मुंबई आणि परिसरातील खासगी शाळांतील आरटीई प्रवेशाच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश संथगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी शाळांकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अद्यापही सहा हजार ४५१ जागांपैकी तब्बल तीन हजार १९८ जागा रिक्त आहेत. प्रवेश संथगतीने सुरू असल्याने मुंबई आणि परिसरात यंदाच्या शैक्षणिक वर्षातही आरटीईच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरटीई प्रवेशाच्या पहिल्या प्रवेश फेरीनंतर सध्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू आहेत. मुंबईत ३४१ शाळांध्ये सहा हजार ४५१ जागा उपलब्ध असून आतापर्यंत यातील तीन हजार २५३ जागांवरच प्रवेश झालेले आहेत. उर्वरित तीन हजार १९८ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये मुंबईतील काही श्रीमंत शाळांकडून शुल्क आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सवलतींचा आधार घेत आरटीईमध्ये पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जात असल्याचे फुले, शाहू, आंबेडकरी पालक-विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी सांगितले.

शिक्षणमंत्र्यांनी लक्ष द्यावे
पहिल्या प्रवेश फेरीमध्ये राज्यभरात २७ हजार मुलांना प्रवेश प्रक्रियेतूनच बाद करण्यात आले. त्यात मुंबईतील आठ हजारांहून अधिक मुले होती. त्यातील असंख्य विद्यार्थ्यांना अजूनही कोणत्याच शाळांमध्ये प्रवेश मिळालेले नाहीत. त्यामुळे आरटीईनुसार प्रत्येक बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण आणि त्याची अंमलबजावणी ही नीट होत नसून त्याकडे शालेय शिक्षणमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवीण यादव यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06591 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top