म्‍हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील विजेत्यांची मुदत संपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्‍हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील विजेत्यांची मुदत संपली
म्‍हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील विजेत्यांची मुदत संपली

म्‍हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील विजेत्यांची मुदत संपली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ऑक्टोबर २०२१ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या प्रधानमंत्री आवास योजना व कोकण म्हाडा गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना पात्रतेसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये सुमारे ३०० अर्जदारांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत.
कोकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजनेमधील संकेत क्रमांक २७० अ, २७१ अ, २७९, २८०, २८१ तसेच कोकण म्हाडा गृहनिर्माण योजनेतील संकेत क्रमांक २५६ ब, २६३ ब, २६८ अ, २६९ अ, २७४ अ, २७८ अ, ३२०, ३२१, ३२२, ३२३ मधील यशस्वी अर्जदारांनी कागदपत्रे सादर केली नव्हती. या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मंडळाने ३१ मेपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीमध्ये सुमारे ३०० अर्जदारांनी कागदपत्रे सादर केली आहेत. सोडतीमधील विजेत्यांकडून कागदपत्रे सादर करण्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेर प्रतीक्षा यादीतील अर्जदारांकडून कागदपत्रे मागवण्याचा विचार मंडळ करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06618 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top