उघड्यावर दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यामुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघड्यावर  दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यामुळे
उघड्यावर दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यामुळे

उघड्यावर दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यामुळे

sakal_logo
By

उघड्यावर दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यामुळे नौदल कर्मचाऱ्यांनी केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात उघड्यावर दारू पिण्यास आक्षेप घेणाऱ्या दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याप्रकरणी नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. १) अटक करण्यात आली आहे. सकाळी ९.३० च्या सुमारास फोर्ट परिसरातील हंसराज दामोदर इमारतीजवळ ही घटना घडली.

नौदल कर्मचाऱ्यांची अरेरावी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाचे सहा कर्मचारी मोकळ्या जागेत मद्यप्राशन करत होते. काही स्थानिक रहिवाशांनी त्यावर आक्षेप घेतला. हा वाद झाल्यावर नौदल कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेले आणि आणखी लोकांसह परतले. या आरोपींनी ज्यांनी दारू पिण्यास आक्षेप घेतला त्या व्यक्तींना मारहाण करण्यास सुरुवात केली. ऐनवेळी पोलिस बीट मार्शल तेथे पोहोचले आणि आसपासच्या लोकांच्या मदतीने तीन नौदलाच्या कर्मचाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले; तर उर्वरित कर्मचारी पळून गेले. ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींना कोर्टाने १५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06624 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top