राज्यसभेत मतदानासाठी देशमुखांचा न्यायालयात अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यसभेत मतदानासाठी देशमुखांचा न्यायालयात अर्ज
राज्यसभेत मतदानासाठी देशमुखांचा न्यायालयात अर्ज

राज्यसभेत मतदानासाठी देशमुखांचा न्यायालयात अर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आमदारांच्या मतांना अत्यंत महत्त्व आले आहे. या पार्श्‍वभूमीवर कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणुकीत मतदान करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांवर सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरचे संजय पवार, तर भाजपच्या वतीने कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी अर्ज दाखल केला आहे. येत्या १० जून रोजी यावर मतदान होणार आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांना एकमेकांच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार, अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या कारागृहात आहेत आणि त्यांची मते मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यामुळे देशमुख यांनी अर्ज केला असून यावर ६ जून रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नवाब मलिक देखील या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता आहे. मलिक महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदावर आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06642 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top